GUPTA MECHANICAL

IN THIS WEBSITE I CAN TELL ALL ABOUT TECH. TIPS AND TRICKS APP REVIEWS AND UNBOXINGS ALSO TECH. NEWS .............

Saturday, 15 June 2024

ई पीक पाहणी : शेतकरी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करू शकतात?


शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई-पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.

पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

ई-पीक पाहणी

जुने सातबारे उतारे पाहिले तर त्यावर ठरावीक पिकांची नोंद झालेली दिसून येते. समजा, तुम्ही विदर्भातील असाल तर सातबाऱ्यावर प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस या पिकांची नोंद आढळेल.

Rashifal 2022 by date of birth |  Rashifal 2022 in hindi


पण, या मुख्य पिकांव्यतिरिक्त शेतात कमी क्षेत्रावर का होईन पण इतरही पीकं घेतली जातात. आता आपल्या शेतातील या सगळ्या पिकांची नोंद शेतकरी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर नोंदवू शकणार आहेत.

यामुळे एखाद्या गावात नेमकं किती क्षेत्र पिकाखाली आहे, याची माहिती कळेल. तसंच सरकारी योजनांचा लाभ घेणं शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरेल. कारण या अॅपच्या माध्यमातून

 शेतकऱ्यांनी अपलोड केलेले पिकांचे फोटो real time data capture करणार आहेत. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं नेमका कोणत्या गट क्रमांकातून आणि खाते क्रमांकातून तो फोटो काढला, हे कळेल, असा सरकारचा दावा आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाही तसंच पीक पाहणीसंबंधीचं पुरेसं प्रशिक्षणही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये, पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणेकडूनच राबवण्यात यावा, या मागणीचं पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

पिकांची नोंद करण्याची प्रक्रिया

ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.

इस्टॉलेशन कम्प्लीट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन.

ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. असं तिथं नमूद केलेलं असेल. याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.

पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.

इथं असलेल्या पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून पुढे वर क्लिक करायचं आहे. जिल्हा, तालुका गाव निडून पुढेवर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खातेदार निवडायचा आहे. पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच गटक्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. गटक्रमांक टाकून शोधावर क्लिक करायचं आहे. मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. मग नोंदणी अर्जासाठी आपण निवडलेली माहिती तपासून पाहायची आहे.

त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो मोबाईल क्रमांक सुरुवातीला दिला त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे, असा मेसेज तिथं येईल. तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा किंवा पुढे वर क्लिक करा. या नंबरवर एक सांकेतांक क्रमांक पाठवला जाईल.

हाच नंबर या अॅपवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणारा आहे.


आता तिथं एक सूचना येईल - मोबाईलवर सांकेतांक क्रमांक पाठवला आहे, तो स्क्रीनवरील रिकाम्या चौकटीत टाका. इथं ठीक आहे असं म्हणायचं आहे.

मोबाईलवर आलेला सांकेतांक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सांकेतांक भरा यावर क्लिक करायचं आहे.

आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता.

इथं सुरुवातीला परिचय द्यायचा आहे. यात खातेदाराचा फोटो असेल तर तो निवडायचा आहे. त्यानंतर लिंग निवडलं की खातेदाराचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तिथं आपोआप येऊन जाईल. मग खातेदाराची माहिती यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे.

मग परिचयमध्ये परत येऊन सबमिट वर क्लिक करायचं आहे. तुमची नवीन माहिती अद्यावत झाली असा तिथं मेसेज येईल. इथं ठीक आहे वर क्लिक करायचं आहे.

आता पुन्हा होमवर परत यायचं आहे.

आता पीक पाहणी अपवर तुम्ही पिकाची माहिती कशी नोंदवू शकता, ते पाहूया... 

सुरुवातीला तुम्हाला खाते क्रमांक आणि त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर या गट क्रमांकात संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे ही माहिती तिथं आपोआप येईल.

पुढे हंगाम (खरीप की संपूर्ण वर्ष) निवडला की पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तिथं आपोआप येईल. या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर तुम्हाला पिकांची नोंद करता येणार नाही.

त्यानंतर पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे.

पुढे मुख्य पीक निवडून ते किती गुंठ्यांमध्ये आहे ते टाकायचं आहे.

त्यानंतर मग दुय्यम पीक1 आणि दुय्यम पीक 2 टाकून त्यासमोर ते किती क्षेत्रावर आहे ते टाकायचं आहे.

एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.

ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला आपण वरती जे पीक मुख्य म्हणून सांगितलं त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.

फोटो काढून झाला की ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकांची नोंद केली ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यावरील शेवटच्या सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

तिथं सूचना येईल की, पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे. तिथं ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे.

आता आपण नोंदवलेली पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर स्क्रीनवर तुम्हाला कोणत्या गटातल्या कोणत्या खाते क्रमांकात कोणत्या पिकाची नोंद करण्यात आली आहे, ही माहिती तिथं दिसेल.

आता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गटातल्या किंवा इतरही पिकांची नोंद करायची असेल तर + या बटनावर क्लिक करून तुम्ही आताची प्रक्रिया पुन्हा करू शकता.

अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता.

एकदा का ही सगळी माहिती भरून झाली की तलाठी कार्यालयात या माहितीची छाननी केली जाईल आणि मग सातबाऱ्यावर पिकांची नोंद होईल.



2 comments: